नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डीझेलच्या दरात लागोपाठ घसरण होत आहे. आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात मोठी घट झाली. आज (24 जानेवारी 2020) पेट्रोल 22 पैसे स्वस्त झाले आहे, तर डीझेलच्या किमतीत 25 पैसे ते 33 पैसे घट झाली आहे. पेट्रोल-डीझेलच्या किमतीत लागोपाठ घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. काल म्हणजे गुरूवारी पेट्रोलच्या किमतीत 17 पैसे आणि डीजलच्या किमतीत 23 पैसे कमी झाले होते. जाणून घेवूयात तुमच्या शहरात पेट्रोल-डीझेलची किती दर आहेत.
पेट्रोल-डीजलचे दर
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये ग्राहकांना पेट्रोलसाठी अनुक्रमे 74.43 रुपये, 80.03 रुपये, 77.31 रुपये आणि 77.31 रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत. तर चार महानगरांमध्ये डीझेल अनुक्रमे 67.61 रुपये, 70.88 रुपये, 69.97 रुपये आणि 71.43 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे.
रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता.
Visit : bahujannama.com