नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये कपात झाल्यानंतर त्याचा परिणाम देशात होत आहे. मागील काही दिवस सलग पेट्रोल डिझेलचे दर कमी होत होते. केवळ शनिवारी पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. तर डिझेलचे दर कमी झाले होते. रविवारी पेट्रोलचे दर ९ पैसे कमी झाले तर डिझेलचे दर १४ ते १६ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे आज पेट्रोल ९ पैशांनी स्वस्त मिळणार आहे.
असे आहेत दर
दिल्ली मध्ये आज पेट्रोलचे दर ७४.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ६५.४९ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ७४.६९ पैसे तर डिझेलचे दर ६७.८७ रुपये प्रतिलिटर एवढे आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर ७७.६५ रुपये तर डिझेलचे दर ६८.६६ रुपये प्रति लिटर दर आहेत. चैन्नईत पेट्रोलचे दर ७४.७८ तर डिझेलचे ६९.१९ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
कालचे दर
दिल्लीत पेट्रोलचे दर ७२.०८ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ६५.६४ रुपये प्रतिलिटर एवढे होते. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोलचे दर ७४.७४ रुपये, ७७.७७ रुपये, ७४.८८ रुपये प्रतिलिटर एवढे होते. तर डिझेलचे दर मुंबईत ६८.०१ रुपये, ६८.८२ रुपये, ६९.३५ रुपये प्रतिलिटर एवढे होते.