नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दुसर्या दिवशी पुन्हा वाढ झालेली दिसून आली. मंगळवारी दरात सलग दुसर्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ७४.६१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहे. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरनंतरची ही सर्वाधिक किंमत आहे. देशाच्या राजधानीत डिझेलची किंमत प्रतिलिटर ६७.४९ रुपये केली आहे. दुसरीकडे सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास तीन टक्क्यांची घसरण झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत ६० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आली आहे.
तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत १९ पैसे, कोलकाता आणि मुंबईत १३ पैसे आणि चेन्नईत १४ पैसे प्रतिलिटर वाढ केली. दिल्लीत डिझेल १६ पैशांनी, कोलकातामध्ये १० पैसे, मुंबईत १२ पैसे आणि चेन्नईत ११ पैशांनी महागले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे ७४.६१ रुपये, ७७.२३ रुपये, ८०.२१ रुपये आणि. ७७.५० रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चार महानगरांमधील डिझेलचे दरही अनुक्रमे ६७.४९, ६९.८५ रुपये, ७०.७६ रुपये आणि ७१.३० रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.
अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चकमकीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वृत्तानंतर गेल्या व्यापार सत्रात ब्रेंट क्रूडचा डिसेंबरमधील डिलिव्हरी कराराचे अंतर २.८८ टक्क्यांनी घसरून ५९.४१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. ब्रेंट क्रूडचे दर सुमारे एक महिन्यानंतर ६० डॉलर प्रति बॅरलच्या खाली बंद झाले. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी ब्रेंट क्रूड ५८.२६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता. यानंतर, मंगळवारी गती परत आली, परंतु किंमत ६० डॉलर च्या खाली राहिली.
Visit : bahujannama.com