नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pest Control | सध्या एका अमेरिकन कंपनीने लोकांना अशी ऑफर दिली आहे जी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. मात्र, याच्या बदल्यात लोकांना लाखो रूपये सुद्धा मिळतील. या ऑफरची चर्चा आता जगभरात होत आहे. उत्तर कॅरोलिना येथील एक कंपनी The Pest Informer, त्या घरांना 2000 डॉलर म्हणजे सुमारे दिड लाख रूपये देत आहे, ज्या घरांमध्ये किमान 100 झुरळं (100 cockroaches) सोडता येतील. (Pest Control)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नॉर्थ कॅरोलिना (North Carolina) बेस्ड पेस्ट कंट्रोल कंपनी आपल्या नवीन पेस्ट कंट्रोल औषधावर रिसर्च करत आहे. यासाठी त्यांना एकाचवेळी जास्त प्रमाणात झुरळांची आवश्यकता आहे. ज्यांच्यावर ते औषधाचा वापर करून पाहतील. आता कंपनी देशभरात अशी कुटुंबे शोधत आहे ज्यांच्या घरात किमान 100 झुरळं सोडता येतील. कंपनी या झुरळांवर सातत्याने लक्ष ठेवणार आहे. (Pest Control)
कंपनी काय करणार झुरळांचे
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही कंपनी किटकांचा नाश करणारे सोल्यूशन पुरवते. सध्या ते अशा जागेच्या शोधात आहेत, जिथे ते आपली सर्व्हिस टेस्ट करू शकतील. त्यांना पाच ते सात अशा कुटुंबांचा शोध आहे, जिथे झुरळं आहेत. ते या किटकांवर आपल्या पेस्ट कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करतील. या संशोधनातून हे पाहिले जाईल की नवीन ट्रीटमेंट ढीठ झुरळांवर किती परिणामकारक आहे. जी कुटुंबे आपले घर रिसर्चसाठी देतील कंपनी त्यांच्या घरात 100 अमेरिकन झुरळं सोडेल.
एक महिन्यापर्यंत चालेल रिसर्च
कंपनीचे हे संशोधन एक महिना चालेल.
या दरम्यान घरातील सर्व झुरळं नष्ट झाली तर ठीक, अन्यथा रिसर्च पूर्ण झाल्यानंतर कंपनी स्वताच त्या झुरळांना नष्ट करेल.
तुमचे घर झुरळमुक्त होईल. मात्र, कंपनीची अट आहे की, या रिसर्चसाठी जी घरे असतील, ती केवळ अमेरिकेतच असावीत.
घरमालकाला रिसर्चसाठी लेखी परवानगी द्यावी लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update