पाटना : वृत्तसंस्था – एका पित्याने चक्क आपल्या मुलाचा नरबळी देण्यासाठी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना परवानगी मागितली आहे. बिहार राज्यातील बेगुसराय येथे हा अजब प्रकार घडला असून, ‘नरबळी देणे हा कोणता गुन्हा नाही. असे त्या परवानगी पत्रात नमूद केले आहे.
बिहार राज्यातील बेगुसराय येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना मुलाचा नरबळी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशे पत्र पाठवले आहे. इतकेच नव्हे तर, ‘नरबळी देणे हा कोणता गुन्हा नाही. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी मी माझ्या मुलाला बळी चढवणार असेही त्या पात्रात नमूद केले आहे. सुरेंद्र प्रसाद सिंह असे मुलाचा नरबळी देण्यासाठी परवानगी मागितलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मोहनपुर पहाडपुर गावातील रहिवासी आहे.
दरम्यान, नरबळीसाठी परवानगी मागणाऱ्या त्या पत्राची गंभीर दखल घेत, नरबळी हा गुन्हा असून त्या सुरेंद्र सिंह याचा शोध घेण्याचे आदेश एसडीओ संजीव कुमार चौधरी यांनी आदेश दिले आहेत. याचबरोबर वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार गावातील लोक त्याच्या विचित्र स्वभावमुळे त्याला खुळा बाबा असे संबोधतात. गावातील लोकांनी सांगितले की, तो कधी कधी निर्वस्त्र फिरत असतो. तर कधी त्याच्या हातामध्ये मानवी कवटी घेवुन फिरत असतो. चर्चेत राहण्यासाठी तो असा विचित्र वागत असतो.