नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत असलेल्या पेन्शनधारकांसाठी एक वेगळा नंबर जाहीर केला असून त्याच्या मदतीने ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळवू शकतात. या नंबरला पेमेंट ऑर्डर म्हटले जात असून कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून पीपीओ नंबर सादर करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर ईपीएफओ कर्मचाऱ्यांना एक पत्र दिले जाईल, ज्यात पीपीओची व्यवस्थित माहिती असेल. एखाद्या व्यक्तीचा पीपीओ नंबर हरवला तर बँक अकाउंटच्या मदतीने तो मिळवला जाऊ शकतो. त्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊया –
जर तुम्ही पेन्शनधारक आहात आणि तुमचा पीपीओ नंबर विसरला तर खालील गोष्टी फॉलो करून बँक अकाउंटच्या मदतीने तो मिळवू शकता.
१. यासाठी सर्वात आधी तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
२. यानंतर तुम्हाला या वेबसाइटच्या डाव्या बाजूला जाऊन पेन्शन पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
३. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला Know Your PPO No. च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
४. येथे तुम्हाला तुमचा तो बँक अकाउंट नंबर टाकावा लागेल जो तुमच्या पेन्शन फंडला लिंक्ड आहे.
५. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीओ नंबर मेंबर आयडी आणि पेन्शन टाईपबाबत माहिती उपलब्ध होईल.
याशिवाय तुम्ही https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ही लिंक नवीन टॅबमध्ये उघडून तुमचा पीपीओ नंबर मिळवू शकता. पीपीओ नंबर संबधित माहिती मिळवायची असेल तर ईपीएफओची वेगळी वेबसाइटवर तुम्ही तुमचे जीवन प्रमाण पत्र, पीपीओ नंबर, पेमेन्ट संबंधी महिती आणि पेन्शनच्या स्टेटसबाबत माहिती मिळवू शकता.