नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pension Scheme | अटल पेन्शन योजना, श्रम योगी मानधन योजना, किसान मानधन योजना इत्यादी मोदी सरकारच्या (Modi Government) आहेत, ज्यांच्यात गुंतवणूक केल्यानंतर तुमचे भविष्य किंवा निवृत्तीचे प्लानिंग (Pension Scheme) करण्याची कोणतीही चिंता राहणार नाही. या योजनांबाबत सविस्तर जाणून घेवूयात…
1. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana- APY)
अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षाचा कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ घेऊ शकतो, ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहे. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरूवात होते. अटल पेंशन स्कीममध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. या पेन्शनसाठी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असावा.
2. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan pension)
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्राशी संबंधीत कामगार, मजूर, श्रमिक इत्यादींसाठी एक महत्वाची योजना आहे. ही योजना फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाच प्रकारची इतर कामे करणार्या असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. यातून त्यांना वृद्धपकाळ सुरक्षित करण्यात मदत होते. सरकार पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता.
3. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan mandhan yojana)
देशातील छोट्या आणि सीमांत शेतकर्यांसाठी प्रधानमंत्री मानधन योजना (PM mandhan yojana) पेन्शन योजना चालवली जात आहे. यामध्ये 60 व्या वर्षानंतर दरमहीना 3000 रुपयांची सुविधा दिली जाते. जेवढा प्रीमियम (Premium) शेतकरी देईल तेवढी रक्कम सरकार सुद्धा देईल. किमान प्रीमियम 55 आणि कमाल 200 रुपये आहे. मधूनच कुणी पॉलिसी सोडली तर जमा रक्कम आणि व्याज (Interest) त्या शेतकर्याला मिळेल. जर त्या शेतकर्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 1500 रुपये दरमहिना मिळतील. 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना (Pradhanmantri Laghu Vyapari maan dhan Yojana) :
पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजनेंतर्गत छोट्या व्यापार्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा हा उपक्रम आहे. ज्याअंतर्गत त्यांना 60 वर्षाच्या वयानंतर वार्षिक 36,000 रुपयांची पेन्शन मिळेल. ही योजना 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक व्यवसाय करणार्या सर्व दुकानदार, स्वताचे काम करणारे आणि किरकोळ व्यापार्यांसाठी आहे. ईपीएफओ, ईएसआयसीचे सदस्य आणि आयकरदात्यांना याचा लाभ मिळणार नाही. पेन्शन योजनेत वय 18 साल ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
असे करा योजनांमध्ये रजिस्ट्रेशन :
या पेन्शन योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करू शकता.
पेन्शन योजनेत सरकार समान योगदान करते.
योजनेचा फायदा घेण्यासाठी नियम खुपच सोपे आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर आणि बँक खात्याशिवाय इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही.
Web Title :- Pension Scheme | know benefits atal pension yojana pm shram yogi mandhan yojana pm kisan maandhan yojana
Anti Corruption Nashik | 8 लाखाच्या लाच प्रकरणात ZP च्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार?
Weather Update | आगामी 5 दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता