नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने पेन्शनधारकांना मोठी भेट देत कर्मचारी, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने पेन्शन वितरित बँकांना ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकांकडून जास्तीत जास्त ६० रुपये चार्ज घेऊन त्यांना घरबसल्या या सुविधा देणार आहेत. यासंबंधी १७ जानेवारी २०२० रोजी परिपत्रक जारी केले असून दरवर्षी सरकारी पेन्शनधारकांना नोव्हेंबरमध्ये आपले अस्तित्व प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागले, ज्यामुळे तुमचे पेन्शन थांबणार नाही.
सर्व पेंशनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर केले जावे या उद्देशाने मंत्रालयाने बँकांना दरवर्षी 1 डिसेंबरला जीवन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना एसएमएस व ईमेलद्वारे आठवण करून दिली जाईल.
मेसेज किंवा मेल पाठविण्याबरोबरच बँकेला विचारणे आवश्यक आहे की तुम्हाला घरी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळवायची आहे का ? सरकारी निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र द्यावे लागेल. मागील वर्षी, 18 जुलै 2019 रोजी केंद्र सरकारने 80 वर्षांवरील पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र 1 नोव्हेंबरऐवजी 1 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी परिपत्रक जारी केले होते.