बहुजननामा ऑनलाइन टीम – किराणा दुकानातून वस्तू खरेदी(Paytm) करण्यासाठी, पाणी व विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी तुम्ही पेटीएम(Paytm) वॉलेटचा वापर करताच. जर आपणही सामान्य व्यवहारासाठी पेटीएम वापरत असाल तर आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे. आजपासून (15 ऑक्टोबर) पासून पेटीएम वापरणे महाग झाले आहे.
दरम्यान, पेटीएम कडून कोणत्याही व्यापारी साइटवर पैसे भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. पेटीएम वरून पेटीएम वॉलेटमध्ये हस्तांतरित करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याच वेळी, आपण डेबिट कार्डद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जोडले तरीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
1 जानेवारी 2020 रोजीही कंपनीने बदलले होते नियम
यापूर्वी 1 जानेवारी 2020 रोजी देखील नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. आतापर्यंत, जर वापरकर्त्याने एका महिन्यात 10 हजार रुपयांपर्यंत क्रेडिट कार्डवरून जोडले असेल तर त्याला कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागला नाही. मात्र 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जोडण्यासाठी त्याला दोन टक्के शुल्क भरावा लागत होता. आता 15 ऑक्टोबरपासून तुम्ही जर क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये कोणतीही रक्कम भरली तर तुम्हाला 2 टक्के शुल्क भरावे लागेल.