मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपी डॉक्टरांचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. तर त्याना पुढील सुनावणी होईपर्यंत कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
Payal Tadvi death case: Bail applications of the accused junior doctors Hema Ahuja, Bhakti Mehre and Ankita Khandelwal, rejected by Mumbai Court.
— ANI (@ANI) June 24, 2019
डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत जामीनासाठी अर्ज केला होता. सोमवारी त्यावर सुनावणी झाली.
पोलीस, आरोपी आणि तडवी कुटुंबियांची बाजू ऐकून न्यायालयाने ऐकून घेतली. त्यानंतर तडवी कुटुंबियांना आरोपींनी धमकवलं असल्याची माहिती अड. सदावर्ते यांनी न्यायालयायात दिली. त्यांना जामीन मिळाल्यास ते पुरावे नष्ट करून साक्षीदारांना प्रभावित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन न देण्याची मागणी केली. त्यानंतर तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.