पटना : वृत्तसंस्था – महायुतीशी संबंध तोडून एनडीएत सामील झाल्यानंतर आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पालटूराम म्हणून संबोधले होते. आता त्याचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी नितीशकुमार यांचे नाव बदलून ते नितीशकुमारी आहेत,असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यासह तेज प्रताप यांनी सीएए, एनआरसीवरही जोरदार हल्ला केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
#लालू ने कहा था पलटूराम, अब #तेजप्रताप ने cm नीतीश को दिया नया नाम, बदल दिया gender#cmnitishkumar #लालूप्रसादयादव #tejpratapyadav pic.twitter.com/s4Ixy5v8a0
— kajal lall (@lallkajal) February 6, 2020
तेजप्रताप यांनी बदलले जेंडर
मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशील मोदी यांच्याविरोधात तेज प्रताप यांनी एक निंदनीय विधान केले आणि त्यांना नितीश कुमारी आणि सुशील कुमारी असे संबोधले. यासह तेज प्रताप यांनी भाजप आणि जेडीयू नेत्यांनी पुढे येऊन राजकीय लढाई लढण्याचे आव्हानही केले. तो म्हणाला की आपल्यात हिम्मत असेल तर या आणि मैदानात लढा. घरी बांगड्या घालून बोलू नका.
महुआ विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी मुख्यमंत्री व नितीशकुमार यांच्यावर टीका करताना सांगितले की, त्यांनी माझे वडील लालू यादव यांची फसवणूक केली आहे. प्रथम म्हटलं की आपण म्हातारे झालो आहोत आणि आता मुलांनी सत्ता घ्यावी. परंतु, लालूची दोन्ही मुले पुढे सरसावल्याचे समजताच, त्यांनी आपले हात बाहेर काढले आणि लालूंना खोट्या खटल्यात अडकविण्यासाठी तुरुंगात पाठविण्याची सक्ती केली.
माझे वडील लालू तुरुंगाबाहेर असते तर त्यांनी गर्दनच उडवली असती
तेजप्रतात यांनी म्हटले की, जर आज लालू यादव जेलच्या बाहेर असते तर कुणाची हिंमत नव्हती की देशात लोकशाही आणि संविधानविरोधी एनआरसी आणि एनपीआर लागू करण्याची. येथे लोक विरोध करत आहेत आणि संसदेत जाऊन येथील लोक त्यांच्या निर्णयांना पाठींबा देत आहेत. लालू बाहेर असते तर यांची गर्दन उडवली असती.
यावेळी जनता या सर्वांचा धूळ चारेल
मसौढ़ी च्या मलकाना मोहल्लामध्ये संविधान बचाओ मोर्चाच्यावतीने आयोजित अनिश्चित धरणे आंदोलनात बुधवारी रात्री जाहीर सभेत बोलताना आमदार तेज प्रताप यादव म्हणाले की, केंद्र सरकार जाती-धर्माचे राजकारण करते. केंद्रातील मोदी सरकार आणि बिहारमधील नितीश यांचे सरकार चेहरा समोर आला आहे. आगामी निवडणुकीत जंताचा या सर्वाना धूळ चारेल.