पटना : वृत्तसंस्था – एका आईला आपल्या मुलीचे दु:ख पहावत नव्हते. ती आपल्या लंपट जावयामुळे त्रस्त होती. तिने मनातल्या मनात एक थरारक योजना आखली आणि त्याला घरी बोलावून दगडाने ठेचून-ठेचून ठार केले आणि त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. सकाळी पेट्रोलिंगला निघालेल्या पोलिसांना मृतदेह आढळला. तपासाअंती ओळख पटल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याठी शोध घेतला असता समजले की, मृत व्यक्ती जमुई जिल्ह्यातील महाराजगंज येथील मोहम्मद शहनवाज आलम आहे आणि त्याचा विवाह आठ वर्षांपूर्वी भागलपुरच्या इशाकचक येथील बरहपुरामध्ये राहणार्या बीवी शबनमची मुलगी सना जमशेद हिच्याशी झाला होता. शहनवाज मुंगेरमध्ये त्याची सासू आणि पत्नीसोबत रहात होता.
दोन दिवसांपूर्वी शहनवाजची पत्नी भागलपुर येथे गेली होती आणि सासू मुंगेरमध्येच होती. गुरुवारी रात्री झोपलेल्या शहनवाजची सासू शबनमने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. नंतर मृतदेह फरफटत दरवाजाच्या बाहेर फेकून दिला. नंतर तिने घरात सांडलेले रक्त स्वच्छ केले आणि हत्येसाठी वापरलेला दगडसुद्धा टाकून दिला, जो पोलिसांनी पुरावा म्हणून नंतर जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, शबनमच्या घरच्यांनी अज्ञातांवर शहनवाजच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, कुटुंबाच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी शहनवाजची सासू आणि पत्नी शबनमला जेव्हा बोलते केले तेव्हा त्यांनी हत्या केल्याचे कबुल केले.
तिने सांगितले, जावयाचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते, यामुळे तिची मुलगी सतत अस्वस्थ रहात होती. याच कारणाला वैतागुन गुरूवारी रात्री 11 वाजता शहनवाजची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी सासूला अटक केली आहे. मृत हा मुंगेरमध्ये कृषी विभागात काम करत होता. पोलीस चौकशीत शबनमने सांगितले की, चार दिवसांपूर्वीच बरहपुरामध्ये एका जमीनीच्या रजिस्ट्रेशनसाठी सर्वजण गेले होते. शहनवाजसोबतच सासू मुंगेरला परतली होती. मुलगी सना घरी नसताना रात्री झोपलेल्या जावयाची हत्या केली. या कुटुंबाने अज्ञातावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सासू संशयित होती. डॉग स्क्वॉयड आणि एफएसएल आणि मोबाइल सीडीआरच्या मदतीने सासूला विचारले असता तिन हत्येची कबुली दिली.
Visit : bahujannama.com