Patil-Kulkarni Farm Atlanta USA | पुण्याच्या शेतकऱ्याने अमेरिकेत फुलवली शेती; गावाच्या आठवणीत बुडवणारा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल (Video)

Patil-Kulkarni Farm Atlanta USA

पुणे: Patil-Kulkarni Farm Atlanta USA | मराठी माणूस आपल्या कलेने जगभरात डंका वाजवत आहे. अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्याचप्रमाणे आता पुण्यातील पाटील-कुलकर्णी हे मराठमोळे जोडपे त्यांनी केलेल्या शेतीमुळे सध्या चर्चेत आलेले आहे. त्याची ही शेती साधीसुधी नव्हे तर अमेरिकेतील अटलांटा येथे फुलवलेली आहे.

https://www.instagram.com/reel/C-R78WIJNai/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

हे जोडपे मूळचे पुण्याचे असून अमेरिकेत आयटी इंजिनियर म्हणून काम करतात तसेच शेतीही करतात. या जोडीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण त्याचे कौतुकही करत आहेत.

दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे पाटील-कुलकर्णी जोडपे म्हणत आहे की, त्यांनी अमेरिकेतील अटलांट मध्ये एक छोटंसं गाव वसवलं आहे. त्यांनी तेथे शेत खरेदी करून त्यामध्ये कोंबड्या, शेळ्या -मेंढ्या , गायी, घोडे आणि एक गाढवही पाळले आहे.

हे जोडपे त्यांना आवश्यक असा सर्व भाजीपाला इथेच पिकवते. त्यांनी पिकवलेली शेतीही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. जोडप्याने आपल्या शेतीत फुलांची शेतीही फुलवली असून त्यामध्ये मधमाशी पालन करत ते मधनिर्मितीही करतात.

दरम्यान या जोडप्याने त्यांच्या शेतात अमेरिकन नागरिकांसाठी शेती पर्यटनही सुरु केलेले आहे. येथे ते येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रीय जेवणाची चवही चाखवतात. तसेच लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी राहण्याची सोयही केली आहे.