Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Cyber Crime

पुणे : Pashan Pune Crime News | तुमच्या नावाने मनी लॉड्रिंग (Money Laundering Case) झाले असून तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची भिती दाखवून एका आय टी इंजिनिअरची सायबर चोरट्यांनी तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पाषाण येथे राहणार्‍या एका ५९ वर्षाच्या आय टी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राहत्या घरी घडली आहे.

मनी लॉड्रिंगच्या नावाने देशभरात दररोज कोट्यावधींची फसवणूक सायबर चोरटे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सायबर गुन्ह्यांची दखल घेऊन त्याबाबत चिंता व्यक्त केली होती. पोलीस, बँकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. असे असतानाही या आय टी इंजिनिअरने आपल्याला अशा प्रकारे सायबर चोरटे फसवणूक करतात, हे वाचनात आले नसल्याचे पोलिसांना सांगितले. (Digital Arrest)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी व मुलीसह पाषाणला राहतात. त्यांना ९ नोव्हेंबर रोजी एक फोन आला. तुमच्या नावावर मनी लॉड्रिंग करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते, असे सांगून त्यांना भिती दाखविण्यात आली. व्हिडिओ कॉलद्वारे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्यावर फिर्यादी यांनी आपण कसे काही केले नसल्याचे सांगितले. तुम्ही केले नसेल तर तुमच्या सर्व आर्थिक व्यवहाराची, बँकेची चौकशी करुन तसे सर्टिफिकेट घ्यावे लागेल, असे सांगून तुमचे वय पाहता तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे सांगून ही बाब कोणाला सांगू नका. व्हिडिओ कॉल बंद करु नका, अशी धमकी दिली. या सर्व बाबीला घाबरुन ते सांगतील तसे फिर्यादी करत राहिले. त्यांनी ही बाब आपली पत्नी व मुलीलाही सांगितल नाही. चौकशी झाल्यावर तुमचे पैसे परत मिळतील, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. सायबर चोरटे सांगतील, त्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत राहिले. त्यांनी एकूण ६ कोटी २९ लाख रुपये ट्रान्सफर केले़ त्यानंतर सायबर चोरट्यांचा संपर्क झाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (PI Swapnali Shinde) तपास करीत आहेत.