Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार; ‘रायगड पॅटर्न’ची चर्चा

पुणे: Parvati Assembly Election 2024 | राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवार ठरवण्याच्या आधीपासून काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
अनेकांचे नाव अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नक्की होत नव्हते. काही मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार बदलले गेले. (दि.२९) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. तर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतरच लढतीचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान आता पर्वती विधानसभा मतदारसंघात रायगड पॅटर्नची चर्चा सध्या सुरु आहे. या मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार पाहायला मिळत आहेत.
पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे उमेदवारी अर्जातील यादीनुसार दिसून आले. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता २२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील २० जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत, अशी माहिती पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात आली. या उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल.
महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी समोरासमोर लढत असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam) यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अश्विनी नितीन कदम नावाच्या दोन उमेदवार आणि अश्विनी अनिल कदम (Ashwini Anil Kadam) नावाने एक अशा तीन उमेदवार आहेत.
एकाच मतदारसंघात नाव साध्यर्म असणारे उमेदवार असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान रायगड विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार दिसला होता.
रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha) अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले होते.
Comments are closed.