Parineeti Chopra | परिणीती चोप्रानं माऊंट एव्हरेस्टला पहात शेअर केला फोटो, म्हणाली – ‘तुम्ही मला विनम्रतेची शिकवण दिली’

parineeti chopra parineeti chopra shares pictures while admiring mount everest says you taught me a lesson in humility

बहुजननामा ऑनलाइन –  Parineeti Chopra | ‘चोप्रा’च्या कन्या कायमच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांका (priyanka) असो अथवा परिणीती (Parineeti Chopra) सोशल मीडिया वरती कायम सक्रिय असतात, चाहत्यांच्या चर्चेमध्ये असतात. प्रियांका रोज नव्याने हॉलिवूड (Hollywood) मधून काहीतरी करताना दिसून येते तर परिणीती बॉलिवूड (Bollywood) मधून नवीन काहीतरी करताना दिसून येते.

एक्ट्रेस परिणीति (Parineeti Chopra) सध्या सूरज बड़जात्यांच्या (Sooraj Barjatya) निर्देशना खाली शूट होत असलेल्या चित्रपटासाठी नेपाळला (Nepal) जाऊन पोहोचली आहे. ‘सौंदर्याचा’ आनंद घेत तिथले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 8 तासापूर्वी पोस्ट केलेल्या फोटोला 4 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे. ब्लु टीशर्ट ब्लु जीन हॅन्ड बॅग हा लूक तिला आणि समोर असलेल्या बर्फाच्छादित ‘एव्हरेस्ट’ ला साजेसा आहे.
अश्या ह्या सुंदर दृश्याचा आनंद घेत परिणीती लिहिते – “गुड मॉर्निंग मिस्टर एव्हरेस्ट, तुमच्या कडे बघून मला नव्याने प्रेरणा भेटली आहे”.

 

 

 

परिणीतीने सोमवारी निर्देशक सूरज बड़जात्या यांच्या सोबतचे ‘एव्हरेस्ट’ समोरील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेयर केले आहेत.
चाहत्यांना आगामी चित्रपटामध्ये परिणीती ‘एक टुरिस्ट गाईड’ च्या रुपात दिसून येणार आहे, चित्रपटाच्या शूटिंग चे शुभारंभ नेपाळ मधून करण्यात आले आहे.

शूटिंग साठी 500 लोकांचे यूनिट हिमालय आणि नेपाळ च्या दुर्गम स्थानी आधीच पोहोचले आहे. ह्या चित्रपटाचे निर्माण राजश्री प्रोडक्शन हाउस मधून केले जातं आहे.
चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका आणि डैनी सारखे दिग्गज दिसून येणार आहेत.

परिणीतिसाठी आगामी चित्रपट खूप खास असणार आहे.
2021 मध्ये परिणीतीचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘साइना’ आणि ‘संदीप पिंकी फरार’ पण चाहत्यांना त्या चित्रपटांनी काही खास आकर्षित केले नाही,
परिणीतीचा आगामी चित्रपट काय खास घेऊन येतोय हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

web title: Parineeti chopra parineeti chopra shares pictures while admiring mount everest says you taught me a lesson in humility.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Postal Life Insurance | पोस्ट विभागाने लाँच केला नवीन डिजिटल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स बाँड, पेमेंट करणे होणार सोपे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Tata Motors च्या शेयरमध्ये 5 दिवसात 42% ची तेजी, आजच 20% वाढला; जाणून घ्या गुंतवणुकीची रणनिती

Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार