Parbhani News | परभणीत महिलाराज ! जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिकेच्या आयुक्त आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदांवर महिला
परभणी : बहुजननामा ऑनलाइन – Parbhani News | महिला सन्मान आणि महिला सशक्तीकरण या केवळ बोलण्याची गोष्टी नसून अमलात आणण्याच्या गोष्टी आहेत. त्याचाच प्रत्यय परभणी (Parbhani News) जिल्ह्यात आला आहे. प्रशासनाच्या अनेक उच्चपदस्थ पदांवर महिलांची नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे परभणी जिल्हा महिला सांभळतात, असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परभणीच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी (District Magistrate – Collector) आचल गोयल (IAS Achal Goyal) आहेत. त्याचबरोबर नुकतीच पोलीस अधिक्षकपदी (Superintendent of Police) रागसुधा आर (IPS Ragsudha R) यांची नियुक्ती झाली आहे. परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी (Municipal Commissioner) तृप्ती सांडभोर (Trupti Sandbhor) या आहेत. त्यांना त्यांच्या कार्यकाळात दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याची जागा रिकामी होती. त्यावर आता रश्मी खांडेकर (Rasmi Khandekar) यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच महत्वाच्या प्रशासकीय पदांवर महिला विराजमान आहेत. (Parbhani News)
त्यामुळे जिल्हा, शहर आणि ग्रामीण प्रशासनात सर्वच ठिकाणी महिलांचा बोलबाला आहे. या जिल्ह्यातील तालुक्यांपैकी चार तालुक्यांना महिला तहसीलदार देखील आहेत. पालममध्ये प्रतिभा गोरे, पाथरीमध्ये सुमन मोरे, पूर्णामध्ये पल्लवी टेमकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात छाया पवार या 4 तहसीलदार जिल्ह्यात कार्यरत आहेत. तसेच स्वाती दाभाडे, अरुणा संगेवार, मंजुषा मुथा या तीन उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणूम काम पाहत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांपैकी अनेक ठिकाणी महिला मुख्याधिकारी आहेत. या सर्वाच्या उच्च पदावर म्हणजे जिल्हा सत्र न्यायाधीश (District Sessions Judge) म्हणून देखील एक महिलाच आहे. यू एम नंदेश्वर (U M Nandeshwar) असे न्यायाधीशांचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परभणी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात महिला प्रशासकीय सेवेच्या अधिकारी पदांवर आहेत.
त्यामुळे जिल्हा प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, ग्रामीण लोकांशी नाळ असलेले जिल्हा परिषद प्रशासन आणि
जिल्ह्याच्या ठिकाणचे प्रमुख शहर असलेल्या महानगरपालिकेचा गाडा महिला अधिकाऱ्याच्या हाती
असल्याने एकमेकींच्या समन्वयातून जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेला जात आहे.
Web Title :- Parbhani News | women officers in all imp post parbhani collector sp commissioner ceo
हे देखील वाचा :
Thane Crime | ठाणे शहरात एका दिवसात दोन गोळीबार; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर?
Comments are closed.