Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

परभणी : बहुजननामा ऑनलाइन – Parbhani News | परभणी येथील एक धक्कादायक प्रकार समोर (Parbhani News) आला आहे. येथील दर्गा रोडवरील (Dargah Road) लग्नाच्या जेवणातून तब्बल शंभरहून अधिक लोकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. विषबाधा झालेल्या शंभर लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) उपचार कारण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे आणखी बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. (Poisoning of 100 people in a meal)

याबाबत माहिती अशी की, परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल (Mehboob Function Hall) येथे एक विवाह समारंभ पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर काही वेळानंतर जवळपास 150 लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला. यानंतर वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Parbhani News)

दरम्यान, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title : Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या