Parbhani Crime News | शेतात काम करत असताना वीज कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू
परभणी : बहुजननामा ऑनलाईन – Parbhani Crime News | मागच्या काही दिवसांपासून राज्यात वाळवीच्या पावसाने थैमान घातले आहे. यादरम्यान परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतामध्ये काम करत असलेल्या ओमकार भागवत शिंदे या 15 वर्षीय मुलाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Parbhani Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशीच एक घटना परभणी तालुक्यातील साडेगाव शिवारामध्ये घडली. यामध्ये शेतात काम करत असताना अंगावर विज पडून बाबाजी केशव नाहातकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर द्वारकाबाई भागवत शिंदे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परभणीमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. (Parbhani Crime News)
या पावसामुळे एकाच दिवशी वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
एवढेच नाहीतर तर परभणीतील सोनपेठ तालुक्यातील तडी पिंपळगाव या ठिकाणी शेतामध्ये बांधलेल्या
दोन बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या बैलांचादेखील मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण
परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Parbhani Crime News | 15 year old boy died due to lightning in parbhani sonpeth
हे देखील वाचा :
Nagpur Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी कार चालकाकडून महिलेला मारहाण
MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण
Comments are closed.