मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यावरून अटक झालेले निलंबित एपीआय सचिन वाझे याचं गूढ कायम असतानाच, याबरोबर आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. सचिन वाझे यांची नियुक्तीची शिफारस तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच दिली होती. असं पत्र समोर आल आहे. यावरून परमबीर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंग यांनी २५ मे २०२० रोजी सचिन वाझे यांची नियुक्ती करावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचच्या गुन्हे गुप्त वार्ता (CIU) मध्ये नेमणूक करण्यात आली होती. तेव्हा वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. CIU हा विभाग गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंर्तगत येतो. त्यामुळे वाझे यांचे शोध गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे सचिन वाझे यांना बंधनकारक होतं. परंतु, वाझे हे थेट माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या संपर्कात होते.
या दरम्यान, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आज दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या गाडी पार्क प्रकरणी चौकशीला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये जावे लागले. सिंग यांच्यासह अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज जवळपास सकाळी ९.३० च्या दरम्यान परमबीर हे चौकशी करता NIA च्या मुंबई कार्यालयात हजर झाले. तसेच, काही दिवसांपूर्वीच परमबीर यांना NIA ने चौकशी करता समन्स बजावला होता. आणि त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देखील आणण्यास सांगितले होते. परमबीर यांची चौकशी NIA चे उच्चाधिकारी करत आहे असे समजते.