मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Parambir Singh |राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना आज (बुधवारी) चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) उपस्थित राहण्यासाठी चौथ्यांदा समन्स (Fourth summons) बजावण्यात आले आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांना आज आयोगासमोर यावे लागेल, जेव्हा ते त्यापूर्वी आले नाहीत, तेव्हा त्यांना 25 हजार रुपयांचा दंड (fine) सुनावण्यात आला. आयोगाविरोधात मुंबई हाय कोर्टात (High Court) याचिका दाखल केली होती. यावरून हाय कोर्टाने आज कोणतेही निर्देश दिले नाहीत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील वसुलीच्या केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने (State Government) नियुक्त केलेल्या न्या चांदिवाल (Justice Chandiwal)आयोगाकडून माजी पोलीस आयुक्त (Former Commissioner of Police) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना (मंगळवारी) 24 ऑगस्ट रोजी 25 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, याअगोदरही न्या चांदिवाल (Justice Chandiwal)आयोगाकडून परमबीर याना 5
हजाराचा दंड सुनावला होता. अनिल देशमुख यांच्यावर आरोपाचे टाकलेले लेटरबॉम्ब यावरून CBI
चौकशी सुरु आहे. दरम्यान, राज्य शासनाने देखील चांदीवाल आयोग नेमला आहे. या आयोगाला परमबीर सिंह यांनी मुंबई हाय कोर्टात (High Court) याचिकेच्या माध्यमातून विरोध केला आहे. जर CBI या प्रकरणात तपास करत आहे तर मग आयोगाच्या माध्यमातून तपास कशाला हवा, असा युक्तिवाद देखील परमबीर सिंह यांच्या वतीने केला गेला आहे.
web title: Parambir fourth summons to parambir singh for present front of chandiwal commission.
Burglary in Pune | पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी
Post Office मधून सुकन्या समृद्धी योजनेत जमा लाखो रुपये झाले ‘गायब’, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?
Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?