मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सुटला असताना नवीन प्रकरणाने डोके वर काढले आहे. माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी हा उल्लेख का काढून टाकला, किंवा राजकीय वाटचालीबाबत त्यांचे पुढचे पाऊल काय असेल याबाबत आता जोरदार चर्चा सुरु आहे.
तसेच पंकजा मुंडे यांनी काल (१ डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहिली. ज्यात त्यांनी १२ डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं घोषित केलं. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे नेमकं काय सांगणार ?असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाचा धक्का भाजप पक्षालाही बसला आहे.
तरी पराभव झाल्याने आणि भाजप सत्ता स्थापन करू न शकल्याने सध्या पंकजा कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असवा असं म्हटलं जात आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेही यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अशाचप्रकारे पक्षाचा उल्लेख काढला होता. तेव्हाही अशीच चर्चांना उधाण आलं होत.
Visit : bahujannama.com