सोलापुर : बहुजननामा ऑनलाईन – पंढरपूर शहर भाजपा अध्यक्ष आणि निर्भिड आपले मत या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक संजय अंबादास वाईकर (वय 51) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वाखरी येथील कोविड सेटंरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोलापूरला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून वाईकर यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण वाढल्यामुळे आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. वाईकर यांच्यावर सोलापुरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी साप्तिहिक आपले मत च्या माध्यमातून 10 वर्ष पत्रकारिता केली. गेल्या तीन वर्षांपासून वाईकर भाजपाचे पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.