बहुजननामा ऑनलाईन – पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे कृत्य केल्याचा आरोप करत विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याप्रकरणी संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसात दाद मागितली आहे. काल रात्री पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी संबंधित संस्था चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल हक्क संरक्षण अधिनियम २०१५च्या कलम ७५ नुसार संस्थाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विद्यार्थ्याला दिलेल्या नोटिशीतील मजकुरामुळे त्या विद्यार्थ्याच्या भविष्यातील शैक्षणिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होत असल्याचे लक्षात येताच व्यवस्थापनावर कलम ७५ जेजे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांतर्गत आरोपीस पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकते. पीडित विद्यार्थ्याचे पालक चहाची टपरी चालवत असून, शिक्षण हक्क कायद्यामुळे या विद्यार्थ्याला शाळेत मोफत प्रवेश मिळाला होता.
Visit : bahujannama.com