पंढरपूर बहुजननामा ऑनलाइन : अल्पवयीन मुलीला दारू पाजून ५ नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पंढरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकाने बलात्काराचा विडिओ करून सोशल मीडिया वर टाकण्याचीही धमकी देखील पीडित मुलीला दिली.
पीडित मुलगी ही एका आरोपीची मैत्रीण होती. तिला एका अज्ञात स्थळी आरोपीने बोलावून घेतले. त्याचे बाकीचे साथीदार अगोदरच त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी तिला दारू पाजली आणि नंतर बलात्कार केला . त्यातील एकाने त्या प्रसंगाचा विडिओ फोन मध्ये काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी त्या पीडित मुलीला दिली. त्यामुळे तिने या संदर्भात कुठेही सांगितले नाही. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपींची तिच्या सतत सामूहिक केला, तसेच पैसे देखील मागितले.
पीडितेने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला, नंतर त्यांनी याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली . पोलिसांनी संबंधित गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केले आहे. एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध आहे.