नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅनकार्डऐवजी आधार कार्ड वापरण्यासाठी अधिसूचित केले आहे. वित्त मंत्रालयाने ६ नोव्हेंबर रोजी सूचना जारी केल्यानंतर केंद्रीय थेट कर मंडळाने (CBDT ) आयकर कायदा १९६२ मध्ये दुरुस्ती करून नवीन नियम लागू केले आहे.केंद्र सरकारने आयकर फॉर्मच्या अनेक संचामध्ये बदल केले आहेत.
तसेच नियमात बदल झाल्यानंतर कोणताही परिणाम होणार नाही याचीही खबरदारी सरकारने घेतली आहे. १ सप्टेंबर, २०१९ पासून आपण आयकरसाठी पॅन नंबरऐवजी आधार नंबर वापरू शकता. २०१९ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅनकार्डऐवजी आधार कार्डचा वापरही वैध होईल, अशी घोषणा केली होती.
सामान्य करदात्यांसाठी याचा अर्थ असा आहे की पॅनकार्डशिवायही ते आपल्या आधार कार्डच्या मदतीने आयकर विवरण भरू शकतात. म्हणजेच पॅनकार्ड ऐवजी आपण आधार कार्डचा वापर करू शकता .प्राप्तिकर अधिनियम १९६२ अंतर्गत येणाऱ्या नियमांमधील बदलानंतर फॉर्म क्रमांक ३AC , ३AD, १० CCB , १० CCBA , १० CCBB , १० CCBBA , १० CCBC इ. मध्ये बदल करण्यात आले आहेत. या फॉर्ममध्ये पर्मनंट खाते क्रमांक किंवा आधार नंबर लिहिला जाईल.
Visit : bahujannama.com