पालघर : बहुजननामा ऑनलाइन – पालघरजवळ तारापूर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की घटना स्थळापासूनचा 15 किलोमीटरचा परिसरात हादरे बसले. तारा नायट्रेट या केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाल्याच वृत्त आहे. परंतु या स्फोटाचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. कोलवडे गावाजवळ हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आसपासच्या 2 ते 3 कंपन्यांना आग लागली. तसेच कंपनीशेजारी एक निर्माणधीन इमारत देखील कोसळली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
#UPDATE SP Palghar: 8 persons dead in the fire that broke out at a chemical factory in Boisar. #Maharashtra https://t.co/hUjbwcAyWd
— ANI (@ANI) January 11, 2020
आज गुजरातमध्ये बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टचा देखील भीषण स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींंना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बडोद्यातील AIMS इन्स्टिट्युट प्रा. लि येथे शनिवारी (11 जानेवारी) ही स्फोटाची घटना घडली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेत कंपनीचे मोठे नुकासान झाले आहे.
मिळालेली माहिती अशी की, AIMS इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर मोठा आवाज झाला.
कंपनीत झालेल्या स्फोटच्या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाने कंपनीत भीषण आग लागली. या घटनेत 7 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. अधिकारी कंपनीत नसल्याचे ते मात्र बचावले. घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 7 रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.