मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एक पाकिस्तानी फुगा अचानक शेतात येऊन पडल्यानंतर अमृतसरमधील लक्खूवाल गावात दहशत निर्माण झाली. या फुग्यावर ‘दिल – दिल पाकिस्तान’ असे लिहिलेले आहे. या फुग्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावातील एका शाळकरी विद्यार्थ्यांला हा फुगा शेतात सापडला. या विद्यार्थ्यांने सांगितले की, फुगा उडत येऊन गावामधील शेतात पडला, या फुग्याला गावाच्या सरपंचाकडे घेऊन गेलो परंतू सरपंच घरी नव्हते.
या प्रकरानंतर गावात भीती निर्माण झाली आहे, लोक या फुग्यावर लिहिलेल्या आशयाची चर्चा करत आहेत. यावर १४ ऑगस्टच्या शुभेच्छा अशा स्वरुपाचा आशय आहे शिवाय या फुग्यावर मोहम्मद अली जीना यांचा फोटो देखील छापलेला आहे. यामुळे तर गावात आधिक गोंधळ निर्माण झाला आहे.
या पाकिस्तानी फुग्यावर ‘दिल – दिल पाकिस्तान’ आणि ‘१४ ऑगस्ट को बधाई’ असे लिहिले आहे, त्यावर उर्दू लिपीत देखील काहीतरी आशय लिहिलेला आहे. ऐवढेच नाही तर या फुग्यावर मोहम्मद अली जीना यांचा फोटो देखील छापलेला आहे.
या प्रकरणी अजनालाच्या एस. एच. ओ यांनी सांगितले की या प्रकरणाकडे माझे लक्ष आहे, परंतू अजूनही हा फुगा माझ्यापर्यंत पोहचला नाही, ज्या संबंधित ते तपास करत आहे, शिवाय हा फुगा कोणत्या हेतूने भारताच्या क्षेत्रात सोडण्यात आला याचा तपास देखील आम्ही करत आहेत.
यामागे एखादा हेतू आहे की हा फुगा हवेत उडत भारतात आला याचा तपास करुन पुढील कारवाई करण्यात येईल.