बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानसाठी काश्मीर प्रश्न इतका महत्वाचा झाला आहे की, त्यामुळे ते स्वतःची नामुष्की करुन घ्यायलाही तयार असतात. आतापर्यंतच्या त्यांच्या कितीतरी वक्तव्यांवर भारतीयांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊनही तेथील नेतेमंडळी आणि तज्ज्ञांनी काश्मीर प्रश्नावर भाष्य कऱणे सोडले नाही. त्याचमुळे ते पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करुन घेत असतात. पाकिस्तानातील टिव्ही चॅनेवर एका शोमध्ये कलम ३७० वर चर्चा सुरु असतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
या शोचं लाइव्ह टेलिकास्टही सुरूअसताना एक विश्लेषक त्याचे म्हणणे मांडत होते. त्याचवेळी ते धापकन आपल्या खुर्चीतून खाली पडले. यादरम्यान शोचा अँकरचे भाव पाहण्यासारखे होते. त्यातच हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असल्याने याचा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. कोणी त्यांना टप्प्याटप्प्याने पडत आहात का असं विचारलं तर कोणी ती खुर्ची चीनची होती का असा प्रश्न केला.
सोशल मिडीयावर पाकिस्तानन स्वतःचा अपमान करुन घेतल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या बैठकीचं फेसबुकवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येत होतं. या लाइव्ह व्हिडीओमध्येच एका मंत्र्याच्या डोक्यावर कॅट फिल्टर लागल्याचं पहायला मिळालं होतं.
During a live discussion on Kashmir an analyst falls off his chair. This happened on Pakistan's GTV. pic.twitter.com/gWGcBoboVi
— Naila Inayat (@nailainayat) September 17, 2019
https://twitter.com/SabahKashmiri/status/1174166108435140608
https://twitter.com/SabahKashmiri/status/1174166108435140608
Visit : bahujannama.com