बहुजननामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर नुकताच बाप झाला आहे. त्याची पत्नी नर्जीसनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 28 वर्षीय क्रिकेटरनं मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.
आमीच्या या पोस्टनंतर आता सर्वजण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनेकांनी मुलीचं कौतुकही केलं आहे.
आमिर आणि नर्जीसबद्दल बोलायचं झालं तर स्पॉट फिक्सिंगमुळं आमिरवर 5 वर्षे बंदी घालण्यात आली होती. याच शिक्षेच्या काळात ब्रिटनमध्येच त्याची आणि नर्जीसची भेट झाली. तिचा जन्म ब्रिटनचाच आहे. या काळात दोघांचं प्रेम जमलं. संकटकाळात नर्जीस खंबीरपणे त्याच्या सोबत उभी राहिली. 2010 मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती.
आमिर आणि नर्जीस यांनी 2016 मध्ये लग्न केलं. 2017 मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. आता तो पुन्हा एकदा बाप झाला आहे. जेव्हा नर्जीस गरोदर होती तेव्हा आमिर पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही. आता पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्याच्या घरी आणखी एक गोंडस मुलगी आली आहे.