नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा आघाडीचा मीडिया हाऊस असलेल्या डॉन न्यूजची वृत्तवाहिनी रविवारी दुपारी हॅक झाल्याचे बोलले जात आहे. या वृत्त वाहिनीची संपूर्ण सिस्टम हॅक करण्यात आली. नेहमीप्रमाणे वृत्तवाहिनी सुरू असतानाच तिरंगा झळकू लागल्यामुळे अचानक प्रसारण थांबले. या तिरंग्यासह स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा मेसेज डिस्प्ले झाला. संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टम हॅक करण्यामागे हॅकर्सचा हात असू शकतो. यासंबंधी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डॉनने निवेदनातून दिली आहे. पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनलवर काल दुपारी साडेतीनच्या सुमारास जाहिरात सुरू होती. त्याचवेळी अचानक जाहिरात थांबली आणि भारताचा झेंडा फडकू लागला. ज्यावर स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज लिहिला होता.
ڈان انتظامیہ نے معاملے کی فوری طور پر تحقیقات کا حکم دے دیا
Read more: https://t.co/LUXoMdG3EM #DawnNews pic.twitter.com/4hImbV70oZ— DawnNews (@Dawn_News) August 2, 2020
यापूर्वीही भारतीय हॅकर्सकडून अशा प्रकारे सिस्टम हॅक झाल्याची घटना घडली असल्याचा आरोप डॉन न्यूज चॅनलकडून करण्यात आला आहे. भारतीय हॅकर्स चॅनेलच्या यंत्रणेवर हल्ला करत आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा चॅनलमधील इतर लोकांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. काही मिनिटांत चॅनल पुन्हा सुरू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.