मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी पाकिस्तानला सर्वात धोकादायक देश म्हणून वर्णन केले आहे. अमेरिकेच्या लष्कराचा दीर्घकाळ अनुभव असलेले आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाचे माजी सदस्य असलेल्या मॅटिस यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रे आणि कट्टरपंथीपणामुळे त्याला धोकादायक म्हणले आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प प्रशासनातून राजीनामा देणाऱ्या मॅटिस म्हणाले की, पाकिस्तानचे पूर्ण लक्ष भारताकडेच लागले आहे. भारताकडे शत्रू म्हणून पाहतात आणि याच आधारे ते अफगाणिस्तानवर नीतिचा वापर करतात. पाकचे लष्कर अफगाणिस्तानमध्ये एक मित्र असलेले सरकार आणू इच्छित आहे जे भारताच्या प्रभावाखाली नसेल.
मॅटिस यांचे आत्मचरित्र ‘कॉल साइन केओस’ मंगळवारी प्रकाशित करण्यात आले. त्यात त्यांनी लिहिले की, ज्या देशात मी काम केले त्यातील पाकिस्तानला मी कट्टरपंथीपणामुळे आणि अण्वस्त्र शास्त्रमुळे खूप धक्कादायक मानतो. अण्वस्त्रांची वाढती निर्मिती पाहता आपण ते दहशतवाद्यांच्या हातात देऊ शकत नाही. त्याचा परिणाम अत्यंत भयानक असेल. ते म्हणाले की, पंतप्रधान इमरान खान यांचे कॅबिनेटमध्ये सदस्य स्वतःच शस्त्रांची क्षमता सांगत आहेत. पाकच्या रेल्वे शेख रशीद यांनी सांगितले की, आमच्याकडे २०० ग्रामचे अणवस्त्र आहेत जे एका सीमित भागाला लक्ष करू शकतात.
पाकच्या नेत्यांबद्दल बोलतांना ते म्हणाले की, पाकचे नेते फक्त स्वतःच्या भविष्याचा विचार करतात, अमेरिका आणि पाकमधील संबंधात अनेक मतभेद आणि अविश्वास आहे. या कारणाने आमच्या पाक बरोबर असलेल्या समस्या संपत नाहीत. लादेनला मारताना पाकला माहिती दिली नाही मॅटिस त्यावेळी अमेरिकन सेंट्रल कमांडचा प्रमुख होता. मॅटिस म्हणाले की, म्हणूनच ओबामा सरकार असताना ओसामा बिन लादेनला मारताना आम्ही पाकला कोणतीही सूचना दिली नव्हती.