नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला आहे. जाधव यांचा खटला आता पाकिस्तान लष्करी कोर्टामध्ये चालवणार नाही, त्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पाकिस्तान आपल्या लष्करी कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. जर कायद्यात अशी सुधारणा झाली तर जाधव यांना आपल्या अटके विरोधात दिवाणी कोर्टात अपील करण्याचा अधिकार मिळू शकेल, असे एएनआयने पाकिस्तानी माध्यमातील वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे.
कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला फटकारले होते. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितले होते. कुलभूषण प्रकरणात १७ जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत ते म्हणाले की, पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम ३६चं उल्लंघन केले आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावले उचलली नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
Pakistan media: The case being tried under Military courts and the Army Act law forbade such individuals or groups from filing an appeal and seeking justice from the civilian court but a special amendment is being made for Kulbhushan Jadhav. https://t.co/ZhVcIgbfAt
— ANI (@ANI) November 13, 2019
२०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे की कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना काउंसलर एक्सेस द्यायला हवा होता. व्हिएन्ना करारान्वये हेरगिरीचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला समुपदेशकाचा प्रवेश दिला जात नाही, असा उल्लेखही कोर्टाने केला नाही. एप्रिल २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अब्दुलकावी अहमद यूसुफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील शिक्षेवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला.
Visit : bahujannama.com