बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानातील करतारपूर साहिब नगर किर्तनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शीख भक्तांसाठी पाकिस्तान दुतवासाने व्हिसा देणे सुरु केले आहे. या नगर कीर्तनासाठी सुमारे १५०० व्हिसा देण्यात येणार आहेत. बहुतेक व्हिसासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष परमजीतसिंग सरना यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने त्यांना २०१८ मध्ये नगर कीर्तन करण्याची परवानगी दिली होती. नगर कीर्तनापूर्वी त्यांचे दोन प्रतिनिधी पाकिस्तानला भेट देतील. पहिले शिष्टमंडळ २० सप्टेंबरला आणि दुसरे २ ऑक्टोबरला भेट देईल. या प्रतिनिधींना एक आठवड्याचा व्हिसा दिला जाईल. ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीपर्यंतचा प्रवाशांना व्हिसा देण्यात येणार आहे.
दिल्ली येथून २८ ऑक्टोंबर रोजी नगर कीर्तनाला प्रारंभ होणार असून ३१ ऑक्टोबरला गुरुद्वारा नानकाना साहिब येथे पोहोचेल. पाकिस्तानच्या वाघा सीमेवर पोहोचल्यानंतर शहर कीर्तनाचे पाकिस्तानस्थित पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार, पंजाबचे राज्यपाल चौधरी मोहम्मद सरवार, धार्मिक कार्यमंत्री पीर नूरुल हक कादरी व अन्य संघराज्य व प्रांतीय मंत्री स्वागत करतील.असे सरना यांनी सांगितले.
करतारपूर साहिब येथे जाणाऱ्या भाविकांना कॉरिडॉर ट्रॅव्हल कार्ड दिले जाईल
डॉ अमीर अहमद यांच्या नेतृत्वात पाकिस्तान अकफ बोर्डाची बैठक झाली. बैठकीत अकफ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कतारपूर कॉरिडोरमधून पाच हजार भाविक गुरुद्वारा श्री करतारपूर साहिब येथे पोहोचतील. या भक्तांना पाकिस्तान सरकार मोफत आरोग्य सुविधा आणि लंगर (जेवण) देईल. यात्रा सुरू करण्यापूर्वी पाकिस्तान सरकार करतारपूर साहिब येथे येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना कॉरिडोर ट्रॅव्हल कार्ड जारी करेल. त्यानंतर भक्ताला पाकिस्तानमधील कतापारपूर कॉरिडोर येथील चेकपोस्टवर पासपोर्ट जमा करावा लागेल. दर्शनानंतर भक्त परतल्यावर त्याचा पासपोर्ट चेकपोस्टवरच मिळेल. प्रवाशांना गुरुद्वारा श्री कतारपूर साहिब येथे नेण्यासाठी पाकिस्तान सरकार पिक-ड्रॉपची सुविधादेखील प्रदान करेल. पाकिस्तान सरकार दरदिवशी दोनशे रुपये भारतसह इतर देशांमधून येणार्या पाच हजार यात्रेकरूंच्या लंगरसाठी खर्च करेल. लंगरसाठी दररोज दहा लाख रुपये खर्च केले जातील.