बहुजननामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भडकलेली पाक सैन्य काहीतरी धोकादायक कट रचत आहे. गुप्तचरांच्या मते पाकिस्तानी सेनाला या षडयंत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारच्या हालचाली सुरू आहेत, त्यावरून असे दिसते की पाकिस्तान एकतर युद्धाची तयारी करीत आहे किंवा भारताला पाकिस्तान खूप घाबरला आहे आणि आपल्या बचाव करण्यासाठी हालचाल करत आहे.
पाकिस्तान काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यामुळे गोंधळून गेला आहे. हेच कारण आहे की, तो मोठ्या षडयंत्र रचण्याच्या प्रक्रियेत आहे. ओपन-सोर्स इंटेलिजेंसने सॅटेलाइटद्वारे फोटो पाठविले आहे. ते भारताची चिंता नक्कीच वाढवू शकतात. सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या तीन फोटोंना पाहून असे वाटते की, पाकिस्तानच्या तीन बंदरांत एकसारखे ऑपरेशन चालू आहे. पाकिस्तानचे तीन मोठे नौदल बंदरे कराची, ओरामारा व ग्वादरला पाकिस्तानचे पूर्णपणे रिकामी करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की ओरमारा येथील जिन्ना नौदल तळ आता पूर्णपणे रिकामा आहे. त्याचवेळी, उजव्या बाजूला असलेला इन्सेट ग्वादर बंदर देखील पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे, तर डाव्या बाजूला असलेली इनसेट कराचीमध्ये नौदलाचे तीन जहाजे उभी असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून घेतल्या जाणाऱ्या या सॅटलाइट फोटोंमध्ये हे फोटो सगळ्यात वेगळे आहे.
यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे रावलपिंडीतील चकला येथील नूर खान पाकिस्तान हवाई दलाचे तळ शिबिर देखील पूर्णपणे रिकामे केले गेले आहे. या फोटोंना पाहिल्यावर असे दिसून येते की, डाव्या बाजूने जे चित्र दिसते त्यावरून असे दिसून येते की, काश्मीरला घेऊन पाकिस्तानमधील तीव्र हालचाल झाली होती,
गुप्तचर अहवालानुसार काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान वेडा झाला आहे. पाकिस्तान चीनच्या मदतीने पीओकेच्या मानसेहरामध्ये युद्धासाठी बोगदा तयार करत आहे. यासोबतच लाइन ऑफ कंट्रोलजवळ पाकिस्तान प्रेशर सेंसरचा वापर करत आहे. पाकिस्तानने हे अमेरिकेकडून खरेदी केले आहे.
पाकिस्तानी सैन्य भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद्यांचा आसरा घेत आहे आणि ते दहशतवाद्यांना १२.७ एमएम हेवी मशीनगन देखील देत आहेत. स्टीलची ही धोकादायक बुलेट पाकिस्तानकडून चिनी कंपनीने आयात केली आहे. याद्वारे एलओसीवर रोबोटिक शस्त्रे वापरुन पाकिस्तान दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करीत आहे.