नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोनाचा वेग प्रचंड वाढल्याने हॉस्पिटल्सची स्थिती दयनीय झाली आहे. रूग्णांना बेड आणि ऑक्सीजन मिळत नसल्याने हाल होत आहेत. ज्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत. अशावेळी डाएट एक्सपर्टनुसार सांगण्यात आलेल्या 10 फुडचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश केल्यास शरीरात ऑक्सीजनचा स्तर योग्य राखता येऊ शकतो.
शरीरात ऑक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी सेवन करा 10 गोष्टी
1 काळे चणे
एक्सपर्टनुसार, काळे चणे आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. तसेच ऑक्सीजन लेव्हल नियंत्रित राहते.
2 संत्रे
तज्ज्ञांनुसार, संत्र्याचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते. संत्रे शरीरात ऑक्सीजन लेव्हल नियंत्रित ठेवते.
3 टरबूज
टरबूजमध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते. शरीर हायड्रेट राहते, रक्ताची भरपाई होते, ऑक्सीजन लेव्हल नियंत्रित राहते.
4 स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि पॉलीफेनोल असल्याने आरोग्य चांगले राहते. हे नियमित सेवन केल्यास उर्जा आणि ऑक्सीजन लेव्हल योग्य राहते.
5 सफरचंद
सफरचंदात अँटीऑक्सीडेंट गुण असल्याने आजारांपासून बचाव होतो. नवीन पेशी तयार होतात. रोज सेवन केल्याने ऑक्सीजन स्तर योग्य राहतो.
6 कीवी
कीवीमध्ये अॅक्टिनिडॅन एंजाइम आढळते, जे शरीरात प्रोटीनच्या पचनास मदत करते. रोज सेवन केल्याने ऊर्जा आणि ऑक्सीजन लेव्हल नियंत्रित राहते.
7 आंबा
आंब्यात व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर आढळते. याच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात, इम्युनिटी वाढते, ऑक्सीजन लेव्हल नियंत्रित राहते.
8 आवळा
आवळ्यात अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे इम्युनिटी वाढते तसेच ऑक्सीजन लेव्हल योग्य राहते.
9 भाजलेले जिरे
जिर्यात आयर्न भरपूर असते. यामुळे रक्ताची कमतरता पूर्ण होते. सोबतच ऑक्सीजन लेव्हल वाढते.
10 व्हिटॅमिन डी रिच वस्तू खा
व्हिटॅमिन डीयुक्त गोष्टीचे सेवन केल्याने कोरोना रूग्णांना लाभ होतो. व्हिटॅमिन डी ऑक्सीजन लेव्हल मेन्टेन ठेवते. उर्जा मिळते, आजार लवकर बरे होतात.