बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा(outdoor) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. आता रूग्णांची संख्या देखील कमी होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या अनलॉक 5.0 सुरू असून शासनाकडून काही गोष्टींमध्ये यापुर्वीच सूट देण्यात आली आहे. दरम्यान, आज पुणे महानगरपालिकेने काही मार्गदर्शक सूचना आणि अटींवर मैदानी(outdoor)आणि इनडोअर खेळांना परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेश मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.
पुणे मनपा क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर क्रिकेट, खो-खो, इत्यादी मैदानी तसेच ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणं शक्य आहे अशा इनडोअर (उदा. बॅडमिंटन, लॉन टेनिस, इत्यादी) खेळांना काही मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा / उपक्रम / संमेलने घेण्यास बंदी राहणार आहे. 10 वर्षाच्या आतील मुलांना तसेच 65 वर्षावरील व्यक्तींना यामध्ये प्रवेश देता येणार नाही. मैदानावर आणि इनडोअर हॉलमध्ये वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे असं सांगण्यात आलं आहे. सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असेही सांगण्यात आलं आहे.