• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

by Namrata Sandhbhor
February 26, 2021
in टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
ott

बहुजननामा ऑनलाईन – भारत सरकारने OTT म्हणजेच ओव्हर द टॉप मीडिया सेवांसाठी आयटी कायद्यांतर्गत नवीन नियामक नियम जारी केले आहेत. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून ओटीटी प्लँटफॉर्मवर आक्षेपार्ह कंटेन्ट दाखविण्यात येत होता, ज्यामुळे अनेकदा वाद ओढवला होता. याबाबत नवीन नियम बनविण्याची तयारी केंद्राकडून केली जात होती. आता हे प्लँटफॉर्म सरकारच्या अखत्यारीत येणार आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये याबाबत माहिती दिली.

स्ट्रीमिंग आणि न्यूज मीडियाचे केले जाणार परीक्षण
सरकारने ओटीटी आणि सोशल मीडिया वेगवेगळे ठेवले आहेत. यासह स्ट्रीमिंग सर्व्हिसेस आणि डिजिटल न्यूज मीडियाचा आयटी कायद्याचा समावेश करण्यात आला आहे. नव्या नियमकांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीचा समावेश आहे. त्याचा परिणाम माध्यमांच्या स्वातंत्र्यास मर्यादित ठेवण्या संदर्भात मानला जात आहे. याव्यतिरिक्त, देखरेख करणारी संस्था एक प्रकारचे सेन्सर मानली जाऊ शकते. याचा परिणाम ओटीटीच्या कंटेन्टवरही होईल.

आक्षेपार्ह कंटेंट हटविण्यासाठी अंतिम मुदत
आता सर्वात मोठा बदल हा आहे की आता नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी कंपन्यांना अधिकाऱ्यांकडून आक्षेप घेतल्यास 36 तासांच्या आत कंटेंट काढून टाकावा लागेल. यामधील कंटेंट न्यायालय किंवा सरकारसाठी आक्षेपार्ह असू शकतो . इतकेच नाही तर अश्लील कंटेंटसाठी 34 तासांचा वेळ आहे. आतापर्यंत प्लॅटफॉर्म जे त्यांच्या कंटेंट संदर्भात स्वतःचे नियम बनवत होते, आता त्यांच्यासाठी नियम कठोर बनले आहेत. त्याचबरोबर ट्वीट आणि पोस्टवर देखील सरकारचे अधिक बारकाईने लक्ष असणार आहे.

सोशल मीडियालाही शेअर करावी लागेल माहिती
आता सोशल मीडियाला 72 तासांच्या आत आपली माहिती तपास अधिकाऱ्यांसह शेअर करावी लागेल. याचा परिणाम असा होईल की, आतापर्यंत जे प्लॅटफॉर्म माहिती शेअर करण्यासंदर्भात आपले निर्णय घेत होते, आता ते नव्या नियमांच्या कक्षेत येतील आणि त्यांना माहिती शेअर करावी लागेल. याकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

नियमनासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
आता कंपन्यांना नियमनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल, जे कायद्याच्या अंमलबजावणीत समन्वय साधण्यासाठी कार्यकारी म्हणून काम करतील. याबरोबरच तक्रार निवारण अधिकारीही नेमले जावेत. ते भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्यांची स्थानिक पातळीवर नियुक्ती केली जाणे आवश्यक आहे. याचा परिणाम असा होईल की सरकार आता या बाबी स्थानिक पातळीवर थेट निकाली काढू शकेल. हे परदेशी कंपन्यांची भारतात स्थानिक कार्यालये चालविण्याप्रमाणेच आहे.

प्रथम निर्मात्याची ठेवावी लागेल माहिती
कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत सरकारच्या आदेशानुसार या व्यासपीठांना कंटेंट बनविणाऱ्या पहिल्या निर्मात्याची माहिती द्यावी लागेल. त्याचा थेट परिणाम व्हाट्सएप, टेलिग्राम, सिग्नलसारख्या सेवांवर होईल. यामुळे एंड टू एंड एन्क्रिप्शन कमकुवत होईल.

दरम्यान, या नियमांमधून हे स्पष्ट झाले आहे की, सरकारला अशी व्यवस्था हवी आहे की ती आक्षेपार्ह कंटेंट रिलीज करण्यापासून रोखू शकेल, त्याव्यतिरिक्त, जर कोणत्याही कंटेंटवर काही आक्षेप असेल तर ते काढून टाकणे सोपे होईल. सरकारचा हेतू कितीही स्पष्ट असला तरीही, पुन्हा एकदा गोपनीयता विरुद्ध सरकारी हस्तक्षेप यासारखे वादविवाद पाहायला मिळतील.

Tags: Government of IndiaITNational Media CenterNew Delhinews mediaOTTPlatformPrakash JavadekarStreamingtechnologyUnion Minister Ravi Shankar Prasadआयटीओव्हर द टॉप मीडियाकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादतंत्रज्ञाननवी दिल्लीन्यूज मीडियाप्रकाश जावडेकरप्लँटफॉर्मभारत सरकारराष्ट्रीय मीडिया सेंटरस्ट्रीमिंग
Previous Post

थेऊर व परिसरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

Next Post

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

Next Post
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ott
टेक्नोलॉजी

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
0

...

Read more

CBI चौकशीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले – ‘मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही’

2 days ago

बोपदेव घाटात छोटा हत्ती चालवण्याचा मोह आवरला नाही, नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू तर तिघे जखमी

2 days ago

नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे कसले ब्रेक द चेन, हे तर चेक द ब्रेन’

2 days ago

मंदिरातून घराकडे निघालेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

1 day ago

Pune : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील घटना

2 days ago

‘पोलार्ड आऊट झाला का?’; CM ठाकरे यांच्या FB Live दरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चर्चा !

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat