बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव हे क्रिकेटच्या विश्वातले मोठे व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती. अशा या व्यक्तीने केवळ क्रिकेट विश्वातच नाही तर गोल्फ जगात देखील आपला बोलबाला केला आहे. भारतीय संघाला १९८३ साली जागतिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या य कर्णधाराने एवीटी चॅम्पियन्स टूर या गोल्फमधील स्पर्धेत विजेतेपद आपल्या नावे केले आहे. तर ओवरऑल विजेतेपद राष्ट्रीय सीमा सुरक्षा दलाच्या पुष्पेंद्र सिंह राठौड यांना मिळाले आहे.
१० शहरांमधील १०० गोल्फ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेतेपद मिळाल्यानंतर कपिल देव म्हणाले, “जिंकणे हे नेहमीच चांगले आहे. ही एक शानदार स्पर्धा आहे. या खेळामुळे जेष्ठ खेळाडूंना देखील प्रेरणा मिळते.”
चौथी फेरी कोलकत्यात पार पडणार
दिल्ली – एनसीआरमध्ये या स्पर्धेची पहिली फेरी मार्च महिन्यात खेळली गेली होती. त्यानंतर बंगळूरमध्ये दुसरी फेरी खेळी गेली होती. तर आता जानेवारी २०२० मध्ये अंतिम फेरी ही कोलकत्यात खेळवली जाणार आहे.
२२५ एकदिवसीय सामने आणि १३१ कसोटी भारतासाठी खेळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने १९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. त्याचबरोबर त्यांनी आता भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीत देखील मोलाची भूमिका पार पाडली होती.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा