पॅरिस : इस्लामिक दहशतवादाविरूद्ध निर्णायक युद्धाची घोषणा करणार्या फ्रान्सने पाकिस्तान(pakistan)च्या 183 नागरिकांचा वीजा रद्द केला आहे. यामध्ये पाकिस्तान(pakistan)ची गुप्तचर एजन्सी आयएसआयचे माजी प्रमुख शुजा पाशा यांच्या बहिणीचाही समावेश आहे. इतकेच नव्हे, तर फ्रान्सने यापैकी 118 लोकांना परत सुद्धा पाठवले आहे. पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी फ्रान्स सरकारला पाशा यांच्या बहिणीला अस्थायी पद्धतीने राहू देण्याची विनंती केली आहे, जी आपल्या सासूची सेवा करण्यासाठी तिथे थांबली आहे. दूतावासाने हे सुद्धा म्हटले की, ज्या 118 लोकांना जबरदस्तीने फ्रान्समधून बाहेर काढण्यात आले आहे, त्यांच्याकडे वैध कागदपत्र होते.
फ्रान्समध्ये मागील महिन्यात शालेय शिक्षक सॅम्युअल पॅटीचे इस्लामिक दहशतवाद्याने शिर धडा वेगळे केले होते. या शिक्षकाने क्लासमध्ये मुहम्मद पैगंबरांचे कार्टून काढून दाखवले होते. यानंतर मॅक्रों यांनी इस्लामिक दहशतवाद्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती. इम्रान खान यांनी मॅक्रों यांच्यावर टीक करत आरोप केला होता की, ते जाणीवपूर्वक मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहेत. फ्रान्सच्या अधिकार्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रों यांच्या टिप्पणीनंतर 183 मुस्लिमांचा वीजा रद्द केला आहे.
पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने ट्विट केले आहे की, आमच्या 183 नागरिकांना प्रदान करण्यात आलेला व्हिजिटर वीजा पीएम इम्रान खान यांच्या टीकेनंतर फ्रान्सच्या अधिकार्यांनी रद्द केला आहे. योग्य कागदपत्र असलेल्या 118 नागरिकांना जबरदस्तीने निर्वासित करण्यात आले होते. आम्ही सध्या आमच्या नागरिकांना अस्थायी पद्धतीने राहू देण्यासाठी फ्रेंच प्राधिकरणाच्या संपर्कात आहोत.
मॅक्रोन यांनी इस्लामवादी फुटीरतावादाशी लढण्याचा संकल्प केला होता, ज्याबाबत त्यांनी म्हटले की, फ्रान्सच्या आजूबाजूच्या काही मुस्लिम समुदायांवर नियंत्रण करण्याची धमकी दिली जात आहे. पॅटी यांना मरणोपरांत फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार, लीजन डी’होनूर प्रदान करण्यात आला, आणि पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठात राष्ट्रीय समारंभात स्मरण करण्यात आले.