पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा (Corona) मोठा फटका बसल्याने पुण्यातील मोक्याच्या जागेवरील जगप्रसिद्ध ओशो आश्रमाची जमीन (Land of Osho Ashram ) ट्रस्टीनी विक्रीला काढली आहे. 3 एकर भूखंडाचा 107 कोटींना व्यवहार ठरत आहे. प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी ही जमीन विकत घेतली आहे. मात्र या भूखंडविक्रीमुळे जगभरातील ओशोचे भक्त संतापले आहेत.
उद्योजक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांच्या बंगल्याला लागून असलेला हा भूखंड ओशो आश्रमाच्या मालकीचा (Land of Osho Ashram ) आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनामुळे आश्रम बंद आहे.
अशा परिस्थितीत आश्रमाच्या देखभालीचा खर्च व्यवस्थापनाला परवडत नाही.
त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी आश्रमाच्या मालकीचा हा भूखंड बजाज यांना विकण्याची परवानगी विश्वस्तांकडून धर्मादाय आयुक्ताकडे मागण्यात आली आहे.
मात्र ओशोच्या काही जुन्या अनुयायांनी हा भूखंड विकण्यास विरोध केला आहे.
ओशो आश्रमाची जागा पुण्यातील प्राईम प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तिला गिऱ्हाईक मिळणे सहज सोपे आहे.
बजाज यांना ही जागा देण्याबाबत सामंजस्य करारदेखील झाला आहे.
यापूर्वी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद उभा राहिला होता.
आता भूखंडविक्री प्रकरणामुळे वाद उभा राहिला आहे. मात्र आश्रमाच्या वतीने यावर कोणी अधिकृतपणे बोलायला तयार नाहीत.
कृपया हे देखील वाचा:
Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका
Break The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…
pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्या करणार्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई
Ajit Pawar। …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार
Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया