बहुजननामा ऑनलाईन– अलकायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन त्याच्या साथीदारांशी पॉर्न व्हिडीओ मध्ये विशिष्ट कोड टाकून संवाद साधत होता. National Geographic च्या एका नव्या डॉक्युमेंट्री शो मध्ये लादेन जवळ मिळालेल्या डिजिटल आणि लिखित सामग्रीचं विश्लेषण करण्यात आलं. ही सामग्री अमेरिकन नवी सीलने त्याच्या घरातून जप्त केली होती. या समुग्रीचं नाव आहे ‘ओसामा बिन लादेनचं हार्ड ड्राइव्ह’. पीटर बर्गेनने या शो मध्ये ओसामा बिन लादेन जवळ सापडलेल्या या फाईल्स कम्युनिकेशन टूल्स होती का हे पडताळून पाहिलं. लादेनच्या पत्रांनुसार तो ईमेलचा वापर करायला घाबरायचा. बाहेरच्या जगाशी तो अधिकतर कम्युनिकेशन कुरियरद्वारे करत होता.
पाकिस्तान मध्ये 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला मारण्यात आलं होतं. अमेरिकी नवी सिलच्या कारवाईच्या वेळी समजलं होतं की लादेन त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात एडल्ट मूवी आणि इरोटीक फोटो ठेवत होता. ‘बिन लादेनची हार्ड ड्राइव्ह’ ही डॉक्युमेंट्री सीएनएनचे नॅशनल सिक्योरिटी एनालिस्ट पीटर बर्गेन यांनी सादर केली होती. ते पश्चिमी देशातील असे पहिले पत्रकार होते ज्यांनी टीव्ही वर लादेनचा इंटरव्ह्यू घेतला होता. ‘बिन लादेनची हार्ड ड्राइव्ह’ शो मध्ये हा विचार मांडण्यात आला की लादेन त्याच्या साथीदारांशी पॉर्न व्हिडीओ मध्ये विशिष्ट कोड टाकून संवाद साधत होता. सीआयए एक्सपर्ट रीड मेलॉय यांनी सांगितलं की लादेन एका सामान्य माणसासारखं कधी कधी अशा एडल्ट सामग्रीचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी करत असावा.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या ऐबटाबादच्या ज्या कंपाउंड मध्ये लादेनला मारण्यात आलं होतं, त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नव्हतं आणि कम्प्युटर देखील नव्हता. तो आणखी 22 लोकांसह त्या घरात राहत होता, त्यामुळं असंही म्हणता येणार नाही की त्याने स्वतः त्या पॉर्न फिल्म जमा केल्या होत्या किंवा तो स्वतः पाहत होता. 2017 मध्ये सीआयएने सांगितलं होतं की लादेन जवळ मिळालेल्या फाईल्सला त्याच्या ‘कंटेंट नेचर’मुळे सुरु करणार नाही.