औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मौजे मावसाळा येथे विश्वशांती बुद्ध विहार बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथे १९ वि धम्म परिषद १९ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे . तर अखिल भारतीय भिक्कूनिसंघ विश्वशांती बुद्ध विहार जटवाडा रोड सुभाषनगर ,भिमटेकडी औरंगाबाद येथे विसाव्या बौद्ध महिला धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले . तसेच या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११४ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक १४ एप्रिल २०१९रोजी करण्यात येणार असल्याचे भिक्कुनी प्रा.धम्मदर्शना यांनी कळविले आहे .
मावसाळा येथील धम्म परिषदेचे अध्यक्ष प्रा.भदन्त सुमेधबोधी (महाथेरो ) प्रचारमंत्री आखिल भारतीय भिक्खू संघ जिल्हा यवतमाळ ,तर उदघाटक कल्पना सरोज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आर .के गायकवाड माजी समाज कल्याण आयुक्त (पुणे ) माधवराव बोर्डे (शिक्षणमहर्षी ),सुभाष माने माजी सहकार आयुक्त पुणे ,गंगापूर -खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.