नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी अनेकदा चार्जिंगची गरज भासते. मात्र, आता येत्या काळात मोबाईल फोन चार्जरला कनेक्ट केल्याशिवायही चार्ज करता येऊ शकतो. त्यासाठी फोनला वायरलेस पॅडचीही गरज भासणार नाही. या नव्या टेक्नॉलॉजीला ट्रू वायरलेस चार्जिंगही म्हटले जाते. स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने ही नवी टेक्नॉलॉजी लाँच केली आहे.
At #MWC21 this year we're showcasing the next evolution in charging ⚡
Presenting Wireless Air Charging – no cable, no charging stand, just freedom to move! #OPPOxMWC21 pic.twitter.com/ZCodQvT9Gm
— OPPO (@oppo) February 23, 2021
Oppo कंपनीने Mobile World Congress-Shanghai (MWCS) 2021 मध्ये सादर केला आहे. कंपनीने 30 सेकंदाचा व्हिडिओही जारी केला आहे. Oppo ने या व्हिडिओच्या माध्यमातून नव्या वायरलेस टेक्नॉलॉजीचा कॉन्सेप्ट फोन Oppo X 2021 सह सादर केला. व्हिडिओत दाखवले, की Oppo X 2021 स्मार्टफोनला वायरलेसली चार्जिंग-मॅटवर चार्ज करत आहे. फोनला हवेत उचलल्यानंतरही फोन चार्ज होत आहे. याला वायरलेस एअर चार्जिंग टेक्नॉलॉजीही म्हटले जाते. Oppo कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वायरलेस एअर चार्जिंग 7.5 W पर्यंत पॉवर देते. हा चार्जिंग मॅट 10 CM पर्यंत रेंजमध्ये डिव्हाईस चार्ज करू शकतो.
दरम्यान, यापूर्वी चीनची कंपनी शाओमीनेही एअर चार्जिंग टेक्नॉलॉजी सुरु करण्याबाबत सांगितले होते. शाओमीची एअर चार्जिंग टेक्नॉलॉजी 5 W पॉवर देते. या माध्यमातून अनेक मीटरपर्यंत कोणत्याही दिशेत फोनला हवेत चार्ज करता येऊ शकते. मात्र, ही टेक्नॉलॉजी युजर्ससाठी कधी उपलब्ध असेल हे अद्याप कंपनीने सांगितले नाही.