नवी दिल्ली : वृत्त – गणराज्य दिनी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट आणि सीमे पलिकडील कोणत्याही हालचालींना उत्तर देण्यासाठी तयारी करताना सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानजवळील पश्चिम सीमेवर एक असे ऑपरेशन सुरू केले आहे ज्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे.
सीमा सुरक्षा दलाने सीमेवर ऑपरेशन थंड हवा गुरुवारी केले आहे. जे 29 जानेवारीपर्यंत चालणार आहे. हा सीमेच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण सराव आहे.
एवढेच नव्हे, तर पाकिस्तानकडून माजी लष्कर प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांना यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. गफूर यांना भारतीय सीमेजवळील ओकारा येथील डिव्हीजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग बनविण्यात आले आहे.
राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर व पंजाबजवळील पाकिस्तानच्या सीमेवर सुरू झालेल्या या सरावात सीमा सुरक्षा दलाच्या कमांडन्टपासून सर्व शाखांचे अधिकारी व जवान सहभागी होत आहेत.
या ऑपरेशनमध्ये सीमेवरील गस्त वाढविण्यात आली आहे. यामध्ये कॅमल पेट्रोलिंग व व्हेईकल पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. रात्रीच्या फूट पेट्रोलिंगमध्ये वाढ झाली आहे. सोबतच सर्व्हिलन्स व इंटेलीजन्स ग्रिडला मजबूत केले जात आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या