बहुजननामा ऑनलाईन टीम : ओपन सिग्नलच्या अहवालानुसार एअरटेलने ४ जी डाउनलोडिंग गतीच्या बाबतीत जिओला मागे टाकले आहे. ओपन सिग्नल रिपोर्टनुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये एअरटेलची डाऊनलोडिंगची सरासरी वेग ९.६ Mbps होता. त्याच वेळी, व्होडाफोन ७.९ Mbps गतीसह दुसर्या क्रमांकावर होता आणि आयडिया ७.६ Mbps गतीने तिसर्या क्रमांकावर आहे.
यावेळी जिओ डाउनलोडिंग वेग ६.७ Mbps सह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान ट्रायने गेल्या महिन्यात रिलायन्स जिओला सर्वात वेगवान नेटवर्क म्हटले होते. ४ जी उपलब्धतेबद्दल बोलताना जिओ आघाडीवर आहे. जिओची ४जी उपलब्धता ९७.८ टक्के आहे. एअरटेलची ४जी उपलब्धता ८९.२ टक्के, व्होडाफोनची ७६.९ टक्के आणि आयडियाची ७७.४ टक्के आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार देशातील ३२ शहरांमध्ये जिओच्या ९८ टक्के ग्राहकांपर्यंत ४ जी पोहोचले आहे. हा अहवाल गेल्या तीन महिन्यांच्या आधारावर म्हणजे १ जून २०१९ पासून आतापर्यंत लिहिला गेला आहे. देशातील ४२ शहरांमध्ये ७६.७७ लाख उपकरणांवर सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com