नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मंदिरातून परत येत असलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली. चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी इंजीत प्रताप सिंह यांनी या घटनेनंतर आतापर्यंतच्या तपासाबाबत माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, या हल्ल्यात निशाणावर आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव नव्हते.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात मरण पावलेली व्यक्ती हल्लेखोरांच्या निशाण्यावर होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची खात्री दिल्ली पोलिसांनी दिली आहे. पोलिस एजन्सी डीसीपीने माहिती देताना सांगितले की परस्पर शत्रुत्वामुळे हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि लक्ष्यित व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला. अशोक मान असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Southwest Addl DCP Ingit Pratap Singh on firing on the convoy of AAP MLA, Naresh Yadav last night: The investigation so far reveals that there was one assailant. Naresh Yadav wasn't the target.The assailant had specifically come to target the man who was shot dead (AAP volunteer) pic.twitter.com/Kzxc06hVZy
— ANI (@ANI) February 12, 2020
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत तपासात एकच हल्लेखोर असल्याचे उघड झाले आहे. त्याने मृत अशोकला लक्ष्य करुन त्याच्यावर गोळीबार केला होता. त्याचवेळी 8 हून अधिक राउंडचा गोळीबार झाला आहे, त्यात मृत अशोकला 5 गोळ्या लागल्या, तर 2 गोळ्या जखमी हरेंद्रला लागली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.