नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचे नवे एसबीआय एटीएम कार्ड घरबसल्या अॅक्टिव्हेट करू शकता. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने ग्राहकांना खास सुविधा दिली आहे. एसबीआयचे ग्राहक आपले नवे एटीएम कार्ड घरबसल्या ऑनलाइन अॅक्टिव्हेट करू शकतात. यासाठी ग्राहकाकडे एसबीआय नेट बँकिंगची सुविधा असली पाहिजे. जाणून घेवूयात एटीएम अॅक्टिव्हेट करण्याची पूर्ण प्रक्रिया…
असे करा अॅक्टिव्हेट करा नवे कार्ड
एसबीआयचे नवे एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी प्रथम बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट www.onlinesbi.com वर जा.
एसबीआय वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर e-Services सेक्शनमध्ये ATM Card Services ऑपशनवर क्लिक करा. यानंतर येथे एक नवीन सेक्शन उघडेल. येथे कोणत्या खात्यासाठी एटीएम कार्ड जारी करण्यात आले आहे त्याची माहिती द्या.
येथे तुमचा 16 अंकी एटीएम कार्ड नंबर दोनवेळा टाका आणि त्यानंतर Activate वर क्लिक करा.खात्याचा प्रकार आणि ब्रांचचे लोकेशनसारखी माहिती व्हेरिफाय करा. नंतर कन्फर्म ऑपशनवर क्लिक करा.
यानंतर बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर हाय सिक्युरिटी पासवर्ड पाठवेल. हा पासवर्ड भरल्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करा.
आता तुमचे नवे एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट होईल. तुम्हाला स्कीनवर मेसेज दिसेल कि, तुमचे एटीएम कार्ड सफलतापूर्वक अॅक्टिव्हेट झाले आहे.
एसबीआयनुसार, नवीन एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट केल्यानंतरच त्याचा वापर करू शकता.
Visit : Bahujannama.com