SBI च्या Rupay जनधन कार्डव्दारे मिळू शकतो 2 लाख रूपयांपर्यंतचा लाभ, आजच करा अर्ज, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सहकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. जर तुमचे जनधन खाते एसबीआयमध्ये असेल किंवा आपण एसबीआयमध्ये नवीन जनधन खाते उघडले तर आपल्याला दोन लाखांहून अधिक रुपयांचा लाभ मिळू शकतो. यासाठी एसबीआयमध्ये रुपे जनधन कार्डासाठी अर्ज करावा लागणार आहे. यासंदर्भात एसबीआयने ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान जन धन योजना-पीएमजेडीवाय अंतर्गत शून्य शिल्लक असली तरी बँकेत खाते उघडले जाते.
It's time to put yourself on the road to success. Apply for SBI RuPay Jandhan card today.#Jandhan #RuPayCard #SBICard #Success pic.twitter.com/frV4AgHgk2
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 6, 2021
पंतप्रधान जन धन योजना- पीएमजेडीवाय अंतर्गत खातेदारांना उघडलेल्या खात्यात अनेक सुविधा मिळतात. या खात्यात ग्राहकांना एक रुपे कार्ड दिले जाते, ज्यामधून आपण खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करु शकता. एसबीआयच्या ट्विटनुसार, जर तुम्ही एसबीआय रुपे जन धन कार्डासाठी अर्ज केला तर तुम्हाला अपघात विमा संरक्षण दोन लाखांपर्यंत मिळेल. यासाठी तुम्हाला हे कार्ड 90 दिवसांत एकदा स्वाइप करावे लागेल. असे केल्याने आपणास दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळण्याचा हक्क असेल.
खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्र
– केवायसीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हींग परवाना, इत्यादी कागदपत्रे सादर करु शकता.
– कागदपत्रे नसतीलतर एक छोटे खाते उघडू शकता
– यामध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटो आणि तुमची सही बँक अधिकाऱ्यासमोर करावी लागेल
– जन धन खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही
– 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते
– जन धन खात्यातून आपण ओव्हरड्राफ्टद्वारे 10 हजार रुपयापर्यंत पैसे काढू शकता
Comments are closed.