• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कांदा निर्यातबंदी ! शरद पवारांनी मोदी सरकारला करुन दिली ‘या’ धोक्याची जाणीव

by pawan
September 15, 2020
in ताज्या बातम्या
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाइन – कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी तातडीनं चर्चा केली. अशा अकस्मिक निर्णयामुळे निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. यानंतर राज्यासह देशातील शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. राज्यातील कांदा उत्पादक भागात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. याबाबत अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शरद पवार यांनी वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा केली.
निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण अशा अकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो. भारत हा निर्यातीच्या बाबत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. अशा परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देशांना मिळतो, हा धोका शरद पवार यांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिला.
कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीच्या आधारावर आला आहे,असे गोयल यांनी पवारांना सांगितले. तरीही केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करुन निर्यातबंदीचा फेरविचार करु, असं आश्वासन पीयूष गोयल यांनी दिलं आहे.
दरम्यान, कांदा प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बैठक बोलावली असून या बैठकीला भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ. भारती पवार, डॉ. भामरे, डॉ. सुजय विखे पाटील इत्यादी खासदार उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. संसद भवनातील पीयूष गोयल यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsExportlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsonionPiyush Goyalsharad pawarकांदानिर्यातबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामोदीशरद पवारसरकार
Previous Post

Vastu Tips : घरातील मंदिराशी संबंधित ‘या’ चुकांमुळे होतो वाईट परिणाम ! अवश्य घ्या ‘या’ छोट्या गोष्टींची काळजी

Next Post

Surya Rashi Parivartan : कन्या राशीत सूर्य, ‘या’ 7 राशीच्या जातकांच्या वाढणार ‘अडचणी’

Next Post

Surya Rashi Parivartan : कन्या राशीत सूर्य, 'या' 7 राशीच्या जातकांच्या वाढणार 'अडचणी'

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
ताज्या बातम्या

कांदा निर्यातबंदी ! शरद पवारांनी मोदी सरकारला करुन दिली ‘या’ धोक्याची जाणीव

September 15, 2020
0

...

Read more

‘या’ 5 जागतिक खेळाडूंनी कधीही एकही वर्ल्ड कप मॅच नाही खेळली, जाणून घ्या

6 days ago

Pune News : ‘बर्ड फ्ल्यू’ने एक ही जीवितहानी नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

2 days ago

तुपामुळं वजन वाढतं ? डोळ्यांच्या तक्रारी दूर करून पित्त शमवतं तूप ! जाणून घ्या फायदे

7 days ago

नामांतरावरून वाद : ‘चर्चा होईल, पण CM ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय’, शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

2 days ago

Pune News : खाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव, पुण्यात खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती साजरी

5 days ago

Pune News : पुण्यातील वाहतूकीच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकलो नाही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat